अतिवृष्टीग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिरातर्फे कोटींची मदत

राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासानं  १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये गेले काही दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसंच शेतीचं आणि नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं मंदिर न्यासानं  म्हटलं आहे.