महाराष्ट्राच्या विविध भागात सरकार विशेष शॉपिंग मॉल उभारणार असून, या ठिकाणी ग्राहकांना शेतकऱ्यांकडून शेत मालाची थेट खरेदी करता येईल. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली.
हे मॉल्स सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर बांधले जातील, आणि त्यासाठी कृषी विभागाच्या मालकीची ३५ हजार एकर जमीन उपलब्ध केली जाईल, असं ते म्हणाले. योजनेनुसार मॉलचा ५० टक्के भाग खासगी व्यावसायिकांच्या वापरासाठी दिला जाईल. यासाठी ३० ते ४० वर्षांचा करार केला जाईल. उरलेला ५० टक्के भाग केवळ शेतकरी संस्था, बचत गट, शेती उत्पादक कंपन्या आणि वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी राखीव असेल असं त्यांनी सांगितलं.