मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ या संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज सहभागी झाले. शिक्षण आणि संस्कृती हे दोन विषय मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत असं ते यावेळी म्हणाले. ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वासाठी प्रार्थना केली, या संस्थेच्या स्थापनेतही अशाच वैश्विक विचाराचं स्वरुप दिसून येतं असं ते म्हणाले.
यावेळी उत्कृष्ट कार्यासाठी संस्थेच्या शिक्षकांचा तसंच बी.कॉम. पदवी परीक्षेत सर्वोत्कृष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला गेला. संस्थेच्या शतदीप या स्मरणिकेचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते झालं. मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आभासी पद्धतीनं या कार्यक्रमात सहभागी झाले होते.