राज्यातल्या ४५३ विशेष शाळांमध्ये बौद्धिक अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम लागू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय संस्थेनं हा अभ्यासक्रम प्रमाणित केला आहे. राज्याचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि जय वकील फाउंडेशन यांच्यात वर्ष २०१९ मध्ये सामंजस्य करार झाला. त्याअंतर्गत दिशा अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित विशेष ओळखपत्र शाळांमध्ये हा अभ्यासक्रम राबवायला सुरुवात झाली अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं या संदर्भातल्या पत्रकात म्हटलं आहे.
Site Admin | August 10, 2025 3:43 PM | Maharashtra
बौद्धिक अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम लागू
