डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्याच्या विविध भागात पाऊस

राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे.  गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काल दिवसभर झालेल्या पावसामुळे तिरोडा तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पावसामुळे  जिल्ह्यातले २१ मार्गांवरची वाहतूक ठप्प झाल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली.

 

गडचिरोली जिल्ह्यातही रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असून, नद्या- नाल्यांना पूर आल्यानं १६ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान गोसेखुर्द धरणातून होणार पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठवरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

 

भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातल्या तामसवाडी इथं एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी येणारी रुग्णवाहिका पावसामुळे झालेल्या  चिखलात अडकली. त्यामुळे या महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत पायीच जावं लागलं. 

 

पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असलं तरीही रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावले असून शेतीच्या कामांना वेग आला  आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.