डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पावसाळ्यासाठी प्रशासन सज्ज, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पावसाळ्यात जीवीत आणि मालमत्तेची हानी रोखण्यासाठी राज्यातल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुटीच्या दिवसांसह २४ तास सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते मोसमी पावासाच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते.

 

आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठीची कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा अधिक पावसाचा अंदाज पाहता सांगली आणि कोल्हापूर महानगरपालिकांनी विशेष तयारी ठेवावी.  दरड कोसळण्याच्या जागी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात. यात जिल्हाधिकारी यांनी प्रामुख्याने लक्ष घालावे. मुंबईत दरड प्रवण अशी एकूण २४९ ठिकाणे आहेत. याबाबत सर्वच संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. असंही त्यांंनी यावेळी सांगितलं. या आढावा बैठकीला  नौदल, वायुलद, सैन्यदल, सागरी सुरक्षा दल, एनडीआरअफ, एसडीआरएफ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अधिकारी आणि सर्व संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिव आदी अधिकारी आणि मंत्री, नेते उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.