राज्यात सरासरीच्या तुलनेत ११७ टक्के पाऊस झाला आहे. कोल्हापुरातला ८५ टक्के आणि अमरावती, रायगड तसंच नाशिकमधला सुमारे ९५ टक्के वगळता इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १७० टक्क्यांहून अधिक पाऊस सांगलीत झाला. जळगावमध्ये सरासरीच्या १४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासात पालघर जिल्ह्यात १७६ मिलीमीटर तर मुंबई शहरात १०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.