September 22, 2025 8:36 PM

printer

महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

अहमदाबाद इथे गेल्या १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताची चौकशी  निष्पक्ष, पारदर्शक आहे का, हे तपासण्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली. तसंच, केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालकांना नोटीस बजावली. या प्रकरणाची स्वतंत्र, निःपक्ष आणि जलद चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सेफ्टी मॅटर्स फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटिश्वर सिंह यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीसाठी प्रतिवादींना नोटीस जारी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या अपघाताची विमान अपघात अन्वेषण विभागाने चौकशी केली होती. त्या चौकशीच्या अहवालात वैमानिक जबाबदार असल्याचं नमूद केलं होतं. त्याला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं होतं.