राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज संपूर्ण राज्यातल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. आणि सर्व यंत्रणांना सतर्क राहायचे निर्देश दिले. गेल्या दोन दिवसांत पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्याच्या विविध भागांमधल्या परिस्थितीची तपशीलवार माहिती देऊन, रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस झाला असून तिथल्या नागरिकांनी पुढचे काही दिवस सतर्क राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. अतिवृष्टीमुळे राज्याच्या विविध भागांत पिकांच्या झालेल्या नुकसानीबद्दल मुख्यमंत्री म्हणाले…