अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचा समारोप

सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. त्या निमित्तानं काल सोलापूरमधल्या हरिभाऊ देवकरण प्रशालेच्या प्रांगणापासून शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यामध्ये अभाविप चे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.