महाराष्ट्राबरोबर सहकार्य वाढवण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक

महाराष्ट्राबरोबर सहकार्य वाढवण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक असल्याचं पोर्तुगालचे राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा, यांनी सांगितलं मुंबईत आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. भारताशी पर्यटन आणि व्यापारासह विविध क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई दौऱ्यात आपण शंभराहून अधिक उद्योग प्रतिनिधींना भेटणार असल्याचंही राजदूतांनी सांगितलं. राज्यपालांनी यावेळी बोलताना, पोर्तुगाल आणि भारतादरम्यानचा सध्याचा व्यापार १ अब्ज दोन कोटी डॉलर वरून किमान १० अब्ज डॉलर वाढवण्याबाबत प्रयत्न करावा, अशी सूचना केली.