ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, कार्यालय आणि अभ्यासिका उभारण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करून जागा निश्चित करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आज मंत्रालयात बावनकुळे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत अनेक जिल्ह्यांमधल्या जागा निश्चितीच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात आलं. ज्या जिल्ह्यांमध्ये जागा अद्याप निश्चित केलेली नाही, त्यांनी तातडीनं योग्य जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करावेत, जिल्ह्याधिकाऱ्यांनी जमीन हस्तांतरण प्रक्रियेसाठी मोजणी शुल्क माफ करावं, अशा सूचना बावनकुळे यांनी यावेळी दिल्या.
Site Admin | October 8, 2025 7:02 PM | Maharashtra | OBC Students
ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या वसतीगृहासाठी जमीन अधिग्रहित करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश
