राज्यात ‘नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत’ कार्यक्रमाचा प्रारंभ

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीनं  देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. त्यामुळे राज्यात पोलीस व्यवस्थेच्या सुधारणांवर भर देण्यात आला असून सायबर सुरक्षेबरोबरच अमली पदार्थ संदर्भातल्या गुन्ह्यांप्रकरणी  राज्य शासनानं ‘झिरो टॉलरन्स धोरण’ अवलंबलं असल्याचं  प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. भाजपा युवा मोर्चाच्या ‘नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत’ कार्यक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत केला, त्यावेळी ते बोलत होते. ‘नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुंबई’ या संकल्पनेवर आधारित या नमो रन मॅरेथाॅनमुळे आपली तरुणाई देशभक्तीला प्राधान्य देईल तसंच देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याच्या आणि आत्मनिर्भर करण्याच्या  ध्यासानं  प्रेरित होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, मिलिंद सोमण आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

सेवा पर्वाचा भाग म्हणून बीडमध्ये आयोजित नमो युवा रन या मॅरेथॉन स्पर्धेला भाजपा नेत्या, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, बीड शहरातील युवकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.