राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांसाठी, तसंच विविध नगरपंचायतींमधल्या १४३ सदस्य पदांसाठी आज शांततेत मतदान झालं. निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४७ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली.
अहिल्यानगरमध्ये दुपारी साडेतीनपर्यंत ५० पूर्णांक २५ शतांश टक्के मतदान झालं.
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत नगरपरिषदेसाठी ५६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
बुलडाणा जिल्ह्यात, देऊळगाव राजा ३६ पूर्णांक २३ शतांश, जळगाव जामोद जवळपास ४६ टक्के, खामगाव सुमारे ४० टक्के, तर शेगाव इथं जवळपास ५० टक्के मतदान झालं.
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपरिषदेसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत साडे ५२ टक्के, तर रेणापूर नगरपंचायतीसाठी ६३ टक्क्यापेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली आहे.
वाशिम जिल्ह्यात ४३ पूर्णांक ३५ शतांश टक्के मतदान झालं.
सांगलीत शिराळा नगरपंचायतीसाठी दुपारी साडेतीनपर्यंत जवळपास ७० टक्के मतदान झालं.
अकोला जिल्ह्यात बाळापूर नगरपरिषदेसाठी मतदान सुरू झालं.
यवतमाळ जिल्हा परिषदेसाठी मतदान सुरू पार पडलं. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी ९ उमेदवार रिंगणात आहेत.
जालना जिल्ह्यातल्या तीन नगरपरिषदांसाठी आज मतदान झालं.
नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद इथं मतदान सुरू असताना पैशाचं वाटप होत असल्याच्या आरोपावरून गोंधळ झाला. लग्नाच्या हॉलमध्ये कथितरीत्या काही मतदारांना अडवून ठेवल्याचं वृत्त खासगी वाहिन्यांनी दिलं होतं. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याचं खंडन केलं आहे. पोलिस आणि निवडणूक पथकानं भेट दिली असता इथं कोणीही आढळलं नाही, असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या सर्व जागा, तसंच २ डिसेंबर रोजी मतदान झालेल्या २६३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी उद्या होणार आहे.