संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे राज्य निवडणूक आयुक्तांचे आदेश

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. राज्यातल्या सर्व महानगरपालिका आयुक्तांची आज दूरस्थ पद्धतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाघमारे यांनी हे आदेश दिले आहेत. प्रारुप मतदार याद्यांवरच्या हरकती आणि सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा, प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निदर्शनाला आल्या तर तक्रारींची वाट न पाहता त्या दुरुस्त कराव्यात असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. दुबार नाव असलेल्या मतदारांना आवाहन करून त्यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा तसंच आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या मतदारांकडून मतदानाच्या दिवशी हमीपत्र लिहून घ्यावं, असे निर्देशही वाघमारे यांनी दिले आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.