महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. आज निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर, अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. काल अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले, तर अनेक ठिकाणी बंडखोरी कायम राहिली आहे. सर्वच राजकीय पक्षात बंडखोरी झाली असून त्याचा फटका बसू नये म्हणून, अर्ज मागं घेण्यासाठी बंडखोरांची समजूत काढल्यानंतर, बंडखोरांनी अर्ज मागे घेतले. परिणामी काही उमेदवार बिनविरोध निवडले गेले.
Site Admin | January 3, 2026 9:48 AM | Elections 2026 | Maharashtra | Municipal Election
Municipal Election : अंतिम उमेदवार यादी आज जाहीर होणार