मुख्यमंत्र्यांचं भाषण ही स्वप्नरंजन गुटिका होती, या अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळाला नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनाच्या आवारात बातमीदारांशी बोलताना केली. लोकांच्या प्रश्नांना उत्तर मिळालं की नाही, त्यावर उपाययोजना केल्या की नाही, याचं उत्तर या अधिवेशनातून मिळालं नाही, असं ते म्हणाले.
सत्ताधाऱ्यांना त्यांच्या चुका दाखवल्या तर ते आधीच्या सरकारकडे बोट दाखवतात, मात्र सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असंही ते म्हणाले. जनसुरक्षा कायद्यात कसलीही स्पष्टता नसल्यानं त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या कायद्याला विरोध असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.