डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हाणामारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी नीतीमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा

विधान भवनात काल झालेल्या हाणामारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी नीतीमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. एका आठवड्यात याचा निर्णय होईल अशी घोषणा अध्यक्षांनी केली. तसंच, मंत्र्यांनीही विधिमंडळात बैठक घेऊ नये, असं आवाहनही अध्यक्षांनी केलं. हे प्रकरण विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. 

 

अध्यक्षांच्या सूचनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. तर या घटनेला आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जबाबदार नाही असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. तरीही या घटनेचं आपल्याला वाईट वाटतं असं आव्हाड म्हणाले.

 

दरम्यान, याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासोबत आलेले सर्जेराव टकले यांच्याविरोधात मरीन ड्राइव्ह पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही विधिमंडळात अनधिकृतपणे आले होते.

 

सभापती राम शिंदे यांनी विधान परिषदेत याविषयावर निवेदन दिलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा