छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम प्रकरणाची चौकशी होणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मौजे लासूर इथे शाळा बांधकाम आणि मौजे गुरुधानोरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी पुढच्या दोन महिन्यात करण्यात येईल आणि तथ्य आढळल्यास त्यावर कारवाई होईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या प्रकरणात आरोप झालेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातल्या शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांचं निलंबन करण्यात आल्याची माहितीही गोरे यांनी दिली. विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.