डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

महाराष्ट्रात शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी तो अहवाल सादर करावा असा आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी हा आरोप केला होता. त्यावरच्या प्रश्नादरम्यान अध्यक्षांनी या सूचना केल्या. 

 

नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा इथे सुरू असलेल्या तेल भेसळीप्रकरणी संबंधित कारखाना तातडीने बंद करून संबंधित अन्न आणि औषध प्रशासन सह आयुक्त तसेच सहाय्यक आयुक्त यांना निलंबित करण्याची घोषणा या विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. याबाबतचा मूळ प्रश्न आमश्या पाडवी यांनी उपस्थित केला होता, त्यावर समीर कुणावार यांनी उपप्रश्न विचारले. संबंधित कंपनी वारंवार तेल भेसळप्रकरणी दोषी आढळून आली आहे, सोयाबीन, शेंगदाणा तेल यांचे नव्याने घेण्यात आलेले नमुने देखील भेसळयुक्त आढळून आले आहेत, असं आढळल्यावर ही कंपनी अधिकाऱ्यांनी तातडीने बंद करण्याची कारवाई करणे आवश्यक होते मात्र ते न केल्यानं त्यांना निलंबित करण्याची घोषणा झिरवाळ यांनी केली.

 

मुंबईतल्या उमरखाडी पुनर्विकास समितीच्या ८१ इमारती पुनर्विकसित करण्यासाठी वास्तुविशारद आणि अर्थविषयक विशेष व्यक्ती नेमण्यात आल्या आहेत, त्यांचा अहवाल तीन महिन्यात अपेक्षित असून त्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली, याबाबतचा मूळ प्रश्न हरीश पिंपळे यांनी उपस्थित केला होता, त्यावर अमिन पटेल यांनी उपप्रश्न विचारले.

 

दरम्यान, सभागृहाचे दिवंगत सदस्य अशोक पाटील डोणगावकर आणि लहानु अहिरे यांच्या निधनाबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यात आली, अध्यक्षांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा