१ जूनपासून पावसाळी नियंत्रण कक्ष सुरु होणार

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीनं येत्या १ जूनपासून पावसाळी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात पावसामुळं उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हा  कक्ष २४ तास सुरु राहणार आहे. मंत्रालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आदी आपत्कालीन नियंत्रण कक्षाबरोबर या नियंत्रण कक्षाचा समन्वय असणार आहे. नागरिकांना  टोल फ्री क्रमांक १ ८ ० ० २ २ ८ ३ ८ ४, नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ० २ २-२ ६ ४ २ ० ९ १ ४ आणि भ्रमणध्वनी क्रमांक ८ ९ २ ८ १ २ ८ ४ ० ६ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.