डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधेयकातल्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना या शब्दाला विरोधकांचा आक्षेप

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान आमदार रोहित पवार यांनी या विधेयकातल्या ‘कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना’ या शब्दांवर आक्षेप घेत, कडवी उजवी विचारसरणी नसते का, असा सवाल विचारला. याऐवजी ‘माओवादी संघटना’ असा शब्द वापरावा, असं त्यांनी सुचवलं. या विधेयकाच्या जुन्या आणि नव्या मसुद्यात काही फार फरक नसून यातल्या अनेक व्याख्या मोघम असून याचा वापर गळचेपी करण्यासाठी होण्याची भीती व्यक्त केली.

 

सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सगळ्या संघटनांवर या कायद्यान्वये कारवाई करणार का, असा प्रश्न आमदार वरुण सरदेसाई यांनी मांडला.

 

हे विधेयक असंविधानिक असल्याचं सांगून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले याला विरोध केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा