डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी संदीप सांगवे यांचं निलंबन करून विशेष तपास पथकाद्वारे चौकशीची घोषणा

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांचं तत्काळ निलंबन करून विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करायची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत केली. आमदार संजय उपाध्याय यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. असे प्रकार फक्त मुंबईत नाही, तर राज्यात अनेक ठिकाणी आढळून आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयएएस, आयपीएस अधिकारी आणि या क्षेत्रातल्या तज्ञांच्या विशेष तपास पथकाची  स्थापन केली असून कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

   एक रुपयात विमा या योजनेत विमा कंपन्यांना सुमारे साडे सात हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे, त्या मानानं शेतकऱ्यांना हवा तसा लाभ मिळाला नाही त्यामुळे पुन्हा जुनी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे अशी माहिती कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली, याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश विटेकर यांनी उपस्थित केली होती. जुन्या विमा योजनेमुळे साधारण पणे साडे चार ते पाच हजार कोटी रुपये वाचतील, अशी माहिती देखील मंत्री कोकाटे यांनी दिली. ज्या शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झाल्याची तक्रार केली आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी माहिती मंत्री कोकाटे यांनी दिली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा