राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकूण ९ कोटी ८४ लाख ९६ हजार ६२६ मतदार असतील. राज्य निवडणूक आयोगाने अद्ययावत यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार यादीनुसार ही यादी प्रसिद्ध झाली आहे. यापूर्वीच्या म्हणजे राज्य विधानसभा निवडणुकीत राज्यात मतदारसंख्या ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ होती. त्यात सुमारे १४ लाख ७० हजार मतदारांची भर पडली आहे. गेल्या ७ महिन्यात ४ लाख ९ हजार ४६ मतदारांची नावं बाद झाली, तर१८ लाख ८० हजार ५५३ नवीन मतदार नोंदले गेले. सर्वात जास्त नवीन मतदार ठाणे जिल्ह्यात २ लाख ७१ हजार ६६६ इतके नोंदले गेले.
Site Admin | November 13, 2025 3:33 PM | Maharashtra Local Body Elections
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर