स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठ्याप्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ते प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिले. या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
राज्य निवडणूक आयोगाला निवडणुकांसाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचं तसंच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनंही आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आश्वासन मुख्य सचिव राजेश कुमार यांनी यावेळी दिलं.