राज्यातल्या ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं आज जाहीर केला. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक धरण्यात आला असून या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येईल. जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाहक गणनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे.
Site Admin | September 23, 2025 8:26 PM
Maharashtra Local Bodies Election: मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
