ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव तातडीने वित्त विभागाकडे पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यातल्या अर्धशतक पार केलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांना प्रोत्साहनपर विशेष अनुदान मंजूर करायलाही मान्यता मिळाली आहे.
राज्यातल्या विद्यापीठं आणि अशासकीय महाविद्यालयांमधल्या रिक्त पदांची भरती, शासन अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरती या मागण्यांनाही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विधानभवनात उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.