चौंडी विकास कामाच्या बृहत आराखड्यासंदर्भात लवकरच बैठक होणार-राम शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सामाजिक न्याय, महिला कल्याण, व्यापार, कृषी आणि न्याय व्यवस्थेसाठी केलेलं कार्य आजही देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे, असं विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर मध्ये चौंडी इथं  अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त आयोजित अभिवादन समारंभात ते आज बोलत होते. चौंडी विकास कामाच्या बृहत आराखड्यासंदर्भात  लवकरच मुख्यमंत्र्यांच्या  अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.