विधानपरिषद पोटनिवडणुकीत पाचही उमेदवारांची बिनविरोध निवड

राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे.