डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

परदेशी गुंतवणूकीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्र देशात अव्वल

परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात गेली दोन वर्ष सातत्यानं देशात अव्वल स्थानी  असलेल्या महाराष्ट्रानं  चालू  आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतही हे स्थान टिकवून ठेवलं आहे.  एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातल्या  एकूण गुंतवणुकीच्या 52 पूर्णांक 46 शतांश टक्के म्हणजेच सुमारे 70 हजार 795 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक्स माध्यमाद्वारे  ही माहिती दिली. इतर आठ राज्यांमधल्या परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षा अधिक गुंतवणूक आणण्यात राज्य सरकार यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं.  या यादीत दुसर्‍या क्रमांकावर कर्नाटक, तिसर्‍या क्रमांकावर  दिल्ली, चौथ्या क्रमांकावर तेलंगणा तर पाचव्या क्रमांकावर गुजरात या राज्यांचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.