येत्या २ वर्षांत एक कोटी लखपती दीदी बनवण्याचं सरकारचं ध्येय – मुख्यमंत्री

राज्यात येत्या २ वर्षांत एक कोटी लखपती दीदी बनवण्याचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज त्यांनी लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता २ हजार ४०० आजारांचा समावेश असून काही गंभीर आजारांवर पाच लाखांपेक्षा जास्त खर्चही राज्य सरकार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.