डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबवण्यासाठी राज्य शासनाने खान अकॅडमीशी सामंजस्य करार केला आहे. याचा लाभ ५० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ मध्ये राज्यातील सुमारे ६२ हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी खान अकॅडमीची जागतिक दर्जाची आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाशी संलग्न असणारी गणित आणि विज्ञान विषयक शैक्षणिक सामग्री अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत समाविष्ट केली जाईल. ही शैक्षणिक सामग्री मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल. चित्रफितीचा वापर करून अभ्यास केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट व्हायला मदत होईल.
Site Admin | October 12, 2025 4:51 PM | Khan Academy | Maharashtra
राज्य शासनाचा खान अकॅडमीशी सामंजस्य करार
