महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं जात आहे.
बीडमध्ये महाविकास आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यात आमदार संदीप क्षीरसागर सहभागी झाले होते. हा कायदा घटनाविरोधी असून लोकशाहीला बाधक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात महाविकास आघाडीनं आंदोलन केलं. सरकारनं या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी अन्यथा हे आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकातही महाविकास आघाडीनं आंदोलन केलं.