डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्र हे असिमित ताकदीचं राज्य आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

महाराष्ट्र हे असिमित ताकदीचं राज्य आहे. आता आपण क्रमांक एक वर आहोत, म्हणून थांबू नका, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना आज सांगितलं. त्यांनी आज विधान भवनातल्या समिती सभागृहात या अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरकारच्या आगामी काळातल्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली. केंद्र सरकारच्या सहकार्याचा राज्याच्या प्रगतीसाठी पुरेपूर वापर करून घेण्यासाठी अधिक समन्वय, पाठपुराव्याची व्यवस्था निर्माण करा, असं ते म्हणाले.
पायाभूत सुविधांप्रमाणेच राज्यातल्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या फ्लॅगशीप योजनांसाठीही स्वतंत्र वॉररूम सुरु करण्याचे त्यांनी निर्देश यावेळी दिले. त्यातून सर्वसामान्य लोकांपर्यत लाभ गतीनं पोहोचवण्यासाठी जनता दरबार, लोकशाही दिन कार्यक्रम वेगानं हाती घ्यावेत, आपले सरकार पोर्टल पूर्ण क्षमतेनं चालवावं, जिल्ह्यांच्या पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्यांचे तातडीनं दौरे सुरु करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. राज्य शासनाची सर्व संकेतस्थळ आरटीआय फ्रेंडली करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. नागरिकांना सुविधा देण्यासाठी तसंच, प्रशासकीय कामांसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याची सूचना त्यांनी दिली. त्यासाठी प्रत्येक विभागानं शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.