प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं. नवी मुंबई विमानतळामुळे राज्याच्या जीडीपीत १ टक्के वाढ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.हा विमानतळ देश आणि राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यावेळी म्हणाले.
या विमानतळाच्या परिसरात तिसरी मुंबई आणि वाढवण परिसरात चौथी मुंबई उभारली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. वाढवण विमानतळ हे समुद्र किनाऱ्यावरचं देशातलं पहिलंच विमानतळ असेल. तसंच मुंबई मेट्रो ३ ही देशातली सर्वाधिक लांबीची मेट्रो असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांची या भाषणात केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विमानतळाचं भूमीपूजन केलं होतं याची आठवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढली. तर पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मदत द्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.