राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं प्रस्तावच पाठवला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. संसदेच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही बाब उघड झाल्याचा दावाही विरोधकांकडून केला जात होता. मात्र, तारांकित प्रश्न हे ३५ दिवसांपूर्वी दाखल केले जातात, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं आणि कृषीबद्दलचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली.