डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक

गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार ८७५ कोटी इतकी विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. ही गुंतवणूक देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के इतकी आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक ३२ टक्के अधिक आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत २५ हजार ४४१ कोटी इतकी परकीय गुंतवणूक आली. राज्याच्या घोडदौडी अशीच सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेचं अभिनंदनही केलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.