राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियान

अन्न आणि औषध प्रशासनामार्फत राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी अभियान राबवण्यात येत असून याअंतर्गत १२ ऑक्टोबरपर्यंत ३ हजार ४५८ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध खाद्यपदार्थांचे एकंदर ४ हजार ६७६ नमुने तपासण्यात आले आणि अनियमितता आढळलेल्या १ हजार ४३१ आस्थापनांना सुधारणा नोटिस देण्यात आल्याची, तर ४८ आस्थापनांचे परवाने निलंबित केल्याची, तर एका आस्थापनेचा परवाना रद्द केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दिली आहे.