डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नागपूरमध्ये शेतकरी संघटनांचं ‘महाएल्गार’ आंदोलन

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना ६ हजार रुपये मानधन, तसंच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या हक्कांसाठी नागपूरमध्ये आज राज्यभरातील शेतकरी संघटना महाएल्गार आंदोलन करत आहेत. आंदोलनात शेतकरी, दिव्यांग, मच्छिमार, मेंढपाळ सहभागी झाले आहेत. या आंदोलनात माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुध्दा सहभागी झाले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू जमलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवास असलेल्या रामगिरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काँग्रेससह अनेक शेतकरी संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.