सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत तसंच कर्जमाफी करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली.
अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारने केवळ ६ हजार ५०० कोटी रुपये इतकीच मदत दिली असून बाकीचे पैसे वेगवेगळ्या योजनांचा भाग आहेत, त्यांचा समावेश पॅकेजमधे करून सरकारने चलाखी केल्याची टीका किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे.