नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारनं ६८९ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर केला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज ही घोषणा केली. जून ते ऑगस्ट २०२५ या काळात अतिवृष्टीनं बाधित या चार जिल्ह्यांमध्ये सरकारी यंत्रणेने तातडीनं पंचनामे करून अहवाल पाठवल्यामुळे ही मदत त्वरित मंजूर केल्याचं जाधव पाटील म्हणाले.
या मदतीचं वाटप करताना शेतकऱ्यांच्या पूर्वीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मदतनिधीचा वापर करू नये आणि मंजूर केलेला सर्व निधी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात द्यावा अशा सूचना बँकांना दिल्या असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.