सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. दिंडोरी तालुक्यातील जानोरी, कोरटे परिसरातल्या भात पिकांच्या नुकसानीची त्यांनी आज पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना नुकसानीबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
Site Admin | November 3, 2025 4:00 PM | farmers | Maharashtra
सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा