अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी आणखी ११ हजार कोटी रुपये पुढच्या १५ दिवसांत शेतकर्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली.
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सुमारे ३२ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. त्यापैकी आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचं वितरण केलं आहे. आणखी ११ हजार कोटी रुपये वितरित करायला आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता दिली असून, ही मदत पुढच्या १५ दिवसांत शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यात नोंदणी सुरू केली जात असून यासाठी नोंदणी करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.