डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शेतकऱ्यांच्या हिताविरोधात कोणतंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही – कृषीमंत्री

शेतकऱ्यांच्या सेंद्रीय उत्पादनांचं प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताविरोधात कोणतंही कृत्य करत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. ते आज मंत्रालयात सेंद्रिय प्रमाणीकरण संस्थांसंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. 

 

शेतकऱ्यांच्या उत्पादनांचं प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्या तरी राज्यातल्या सेंद्रीय प्रमाणित आणि नैसर्गिक शेती उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासन त्यांच्या सेंद्रीय प्रमाणपत्रांची तपासणी करणार आहे. तसे निर्देश भरणे यांनी यावेळी दिले. दोषी आढळलेल्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत अहवाल केंद्र सरकारकडे पाठवेल. शेतकरीही कायद्याचा आधार घेवून अशा संस्थेविरूद्ध तक्रार देवू शकतात, असं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.