डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यातल्या निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,  नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली. या यादीतली नावे mahasecvoterlist.in या वेबसाइटवर मतदारांना शोधता येतील. तहसील, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या कार्यालयातही ही यादी उपलब्ध आहे. 1 जुलै 2025 रोजी विधानसभा मतदार यादीत नाव असलेल्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.