महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार, महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी येत्या २० तारखेला जाहीर होईल. २७ नोव्हेंबरपर्यंत त्यावरच्या हरकती आणि सूचना दाखल करता येतील. तर अंतिम मतदार याद्या ५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील. ८ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध होईल तर १२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
Site Admin | November 13, 2025 9:11 PM
महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर