November 23, 2025 7:21 PM | maharashtra election

printer

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या जोरदार प्रचार

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रचारानं जोर धरला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज वसमत, भोकर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्या. लोक काँग्रेसनं ७५ वर्षात काय दिले असा प्रश्न विचारतात काँग्रेसनं रोजगार, शिक्षणासह असंख्य कामं केली असं त्यांनी सांगितलं. काँग्रेसच्या कामांचा हिशोब करायला गेल्यावर कागद संपतो मात्र भाजपाच्या कामांचा हिशोब केला तर त्यांनी राज्याला खोटारडेपणा दिला अशी टीका त्यांनी केली. भाजपा हा पक्ष फोडणारी टोळी बनली आहे अशी टीकाही त्यांनी केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.