राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं देत नसल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं का देत नाही असा सवाल काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं, की राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तरं दिली पाहिजेत परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात लेख लिहून जनतेची दिशाभूल केली आहे. राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आणि किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी प्रसारमाध्यमांशी बोलतात या आक्षेपावर प्रसारमाध्यमं हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, हे निवडणूक आयोगाला मान्य नाही का,  असा सवाल सपकाळ यांनी विचारला. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.