डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 19, 2025 8:10 PM | maharashtra crime

printer

गुन्ह्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात ८ व्या स्थानी

राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात अनेक आव्हानं आहेत. पण त्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत केलं. अर्थसंकल्पातल्या गृह विभागाच्या अनुदानावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते.

 

नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना अजिबात क्षमा करणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.गुन्ह्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात ८ व्या स्थानी आहे. विनयभंगाचा गुन्हा आता बलात्कार म्हणून नोंदवायला सुरुवात केली आहे. परिणामी महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंद होण्याचं प्रमाण १० वर्षात वाढलं आहे. यातले ९९ टक्क्यांहून अधिक बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तीकडून होतात याकडे त्यांनी लक्ष वेधलं.]

 

गृह, जलसंपदा, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, पाणी पुरवठा आणि स्वच्छता तसंच पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या अर्थसंकल्पातल्या मागण्या आज विधानसभेत मंजूर झाल्या.