December 9, 2025 7:31 PM | Cold | Maharashtra

printer

राज्यात गारठा वाढला!

राज्यात बऱ्याच ठिकाणी गारठा वाढला आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट पसरली असून आज पारा ५ पूर्णांक ३ दशांश अंश सेल्सीअसपर्यंत घसरला. उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यानं हुडहुडी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात आज ५ पूर्णांक ९ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक शहरातही पुन्हा थंडी वाढली असून आज सकाळी ९ पूर्णांक ३ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, अहिल्यानगरमध्ये ७ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या हंगामातल्या सर्वात कमी १२ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सियस तापमानाची नोंद आज झाली.